'बाबा थांबा म्हणत मोदी है तो मुमकीन है' ; मंत्री नवाब मलिक यांचे उपहासात्मक ट्वीट
योगगुरु बाबा रामदेव यांनी सध्याच्या स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना हा देशहितविरोधी आहे, असे वक्तव्य केल्यानंतर आता त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी रामदेवबाबा यांच्यावर जोरदार टीका केली आहेत. त्यांनी बाबा थांबा म्हणत मोदी है तो मुमकीन है असं उपहासात्मक ट्वीट केलं आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी मोदी आणि रामदेव बाबा अशा दोघांवर टीका केली आहे.
Babaji rokiye na #ModiHaiToMumkinHai https://t.co/oYsGIf2SYs
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 23, 2021
हा सामना भारताच्या राष्ट्रधर्माच्या विपरित आहे, असं योगगुरु रामदेव बाबा यांनी नागपुरात वक्तव्य केले होते. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'टी-20' सामना होत आहे हा सामना भारतीय राष्ट्रधर्माच्या विपरित आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर आता मलिक यांनी बाबाजी रुकीये ना मोदी है तो मुमकीन है अशी उपहासात्मक टीका केली. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील तर काहीही होऊ शकतं असं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
एकीकडे आतंकी खेळ आणि दुसरीकडे क्रिकेटचा खेळ, या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाहीत, असे रामदेव बाबा म्हणाले.