मुंबई// पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना आंदोलक शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. जसे सरकारला कायदे बनवण्याचा अधिकार आहे , तसा कायदे मागे घेण्याचाही अधिकार आहे असं मलिक म्हणाले.
आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं केलं.
पंतप्रधान मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. दरम्यान आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सोबतच शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.