मंत्री आव्हाडांचा पुन्हा रश्मी शुक्लांवर पुन्हा एक बॉम्ब : अपक्ष आमदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

Update: 2021-03-25 10:12 GMT

सचिन वाझे, परमबीर सिंह नंतर फोनटॅपिंग प्रकरणावरुन सध्या राज्याच्या राजकारणात राळ उठली असून रोज नवे खुलासे पुढे येत आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस अधिकारी रश्मी शुक्लांनी बेकायदेशीर फोन टेपिंग केल्याचा आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत शुक्लांवर आरोप केले आहेत. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर ते सुप्रिम कोर्टात गेले होते. तिथे याचिका फेटाळल्यानंतर महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा नवा बॉम्ब टाकला आहे. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता.



काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फोन टॅपिंगवरुन जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले होते. त्यामुळेच सीताराम कुंटे यांच्याकडून हा अहवाल आजच मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीला गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवही उपस्थित राहणार आहेत. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल तयार करण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती आहे.

फोन टॅपिंग झालं तेव्हा कुंटे हे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते. आपल्याकडून या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचं काल कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसंच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचंही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. प्रकरणात आता सविस्तर अहवाल तयार केला जात असल्याची माहिती आहे.

Tags:    

Similar News