गुलाबराव पाटील यांनी का काढला संजय राऊत यांचा बाप...

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिंदे समर्थक नेत्यांच्या नावानं विचारलेल्या प्रश्नावर थुंकल्याचं प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. मंत्री गुलाबराव पाटील यांनी हाच धागा पकडत राऊत यांच्यावर जहरी टीका केलीय.;

Update: 2023-06-06 08:18 GMT


महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केलीय. संजय राऊत यांनी एका चॅनल वर मुलाखत देताना थुंकल्याने यावर संतप्त झालेले गुलाबराव पाटील यांनी राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. आताच राजकारण खूप खालच्या स्तरावर गेले आहे. राउत हे थुंकतात, कुठं चाललं आहे राजकारण असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

संजय राऊत थुंकतो बावळट आहे तो असा एकेरी उल्लेख खासदार संजय राऊत यांच्याबाबत करून यापूर्वी देशात कोणताच पक्ष फुटला नाही का ? उठसुठ 40 आमदार संपवून टाकू म्हणणारे राऊत कोण लागले ? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केलाय. राऊत हे आमच्या मतांनी निवडून आलेल्या चोरटा आहे, आधी राजीनामा दे मग बोल, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केलीय. राऊत म्हणतात आमदार शिवसेनेच्या मतांवर निवडून आले आहेत. तुमचा बाप आम्हाला निवडून द्यायला आला होता का ? असाही प्रतिप्रश्न गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.

 Full View

Tags:    

Similar News