शरद पवारांच्या सांगण्यावरून विरोधक आरक्षणाच्या बैठकीला गैर हजर - मंत्री छगन भुजबळ
बारामतीतून फोन गेला. याचे पुरावे भुजबळ यांनी द्यावे -सुप्रिया सुळेंच प्रत्युत्तर
पणे - पावसाळी अधिवेशनादरम्यान आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीला सर्व विरोधी पक्षाचे नेते येणार होते. मात्र बारामतीतून कोणाचातरी फोन आला आणि विरोधी पक्षाने बैठकीवर बहिष्कार टाकला. असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. बारामतीतून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या भुजबळ यांनी शरद पवार यांना राजकिय टोला मारला आहे.
या बैठकीवर विरोधी पक्षाने आणि विरोधी पक्षांतील नेत्यांनी बहिष्कार टाकला नको होता. विरोधी पक्ष नेत्यांनी शरद पवार यांना या बैठकीला घेऊन यायला हवं होतं. असं देखील भुजबळ म्हणाले. बैठकी च्या अनुषंगाने आरक्षणाच्या संदर्भात काही अहवाल विरोधी पक्ष नेते विजय भट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांना दिले होते. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी देखील या आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला यायला पाहिजे होतं. असं देखील मंत्री भुजबळ यावेळी म्हणाले.
बारामतीतून फोन गेल्यामुळे विरोधक आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाही. या भुजबळांच्या आरोपाला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. बारामतीतून फोन गेल्यामुळे विरोधक बैठकीला गैरहजर राहिले या भुजबळांच्या आरोपात जर तथ्य असेल, तर भुजबळांनी त्या संदर्भांत पुरावे द्यावा. असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांना दिल आहे. तर छगन भुजबळ हे बिना आधारे, व खोटं बोलतात. असे मत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.