'मुंबई-बत्तीगुल' वीज नियामक आयोगाकडून वीजकंपन्यांना हजर हो..! चे आदेश
मागील सोमवारी मुंबईत बत्तीगुल झाल्यानंतर सत्ताधारी- विरोधकांचे आरोप प्रत्यारोप झाले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी षडयंत्र असल्याची शक्यता वर्तवली असताना आता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सुमोटो याचिका दाखल करून बुधवारी सुनावणी ठेवली आहे.;
मुंबई ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील सोमवार खंडित झालेल्या वीज पुरवठय़ाची महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने गंभीर दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली. त्यावर बुधवार 21 ऑक्टोबर रोजी ई- सुनावणी होणार असून महापारेषणसह एलडीसी, अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर, बेस्ट आणि महावितरणला आपली बाजू मांडण्याबाबत बजावले आहे.
महापारेषणच्या वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी यामागे खरी काय करणे आहेत, वीज पुरवठा खंडित झाला त्यावेळी ग्रीडची काय स्थिती होती, याबाबतचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश महापारेषण कंपनीला दिले आहेत. त्यानंतर बुधवारी होणारया सुनावणी दरम्यान मुंबई आणि परिसरात वीज वितरण कंपन्यांनी कशा पद्धतीने लोड शेडिंग हाताळले, वीज पुरवठा सुरू करताना मार्गदर्शक तत्वाचे पालन केले यावर सुनावणी सुनावणी होणार असल्याचे वीज आयोगाने स्पष्ट केले आहे.