अनेक निराधार व्यक्तींना आधार देणाऱ्या सिंधुताई आपल्या प्रेमळ बोलण्याने समोरच्याला पटकन आपलंसं करुन घ्यायच्या. लहान थोरांपासून सर्वांनाच त्या आपलं लेकरु मानायच्या. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही फोन करुन प्रोत्साहन दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना सिंधुताईंनी केलेल्या या फोन कॉलची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती, हा संवाद आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे...