'मी पुन्हा येईन'वरुन शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

आगामी काळातील जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सक्रीय झाली आहे.;

Update: 2022-03-07 03:42 GMT

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी उस्मानाबाद दौऱ्यात मी पुन्हा येईन वरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. तर भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार उस्मानाबाद दौऱ्यावर असताना म्हणाले की, मी येणार, मी येणार असं सातत्याने सांगितले जात होते. पण मी येऊ दिले नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

यावेळी शरद पवार यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ही आघाडी यशस्वी झाली आहे. तर उध्दव ठाकरे चांगलं काम करत आहेत. त्यामुळे सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी महाविकास आघाडीचे काम सुरू आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज असते का? असे वक्तव्य केले होते. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले, असे वक्तव्य करणाऱ्या लोकांना जास्त किंमत द्यायची नसते.

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सक्रीय झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात झालेला मेळावा हा जिल्हा परिषद निवडणूकांचा शुभारंभ आहे का? अशी चर्चा आहे. मात्र मी पुन्हा येईन वरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला फडणवीस काय उत्तर देतात ते पाहणे औत्सुक्याचे आहे.


Tags:    

Similar News