भारतीय कुस्तीगीर महासंघाचं सदस्यत्व रद्द, आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार- रामदास तडस

Update: 2023-08-24 11:08 GMT

जागतिक कुस्ती महासंघाने दिलेल्या मुदतीत भारतीय कुस्ती महासंघाने निवडणूका घेतल्या नाहीत. त्यामुळे जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द केलं आहे. त्यावरून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाला 45 दिवसात निवडणूका घेण्यास सांगितले होते. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक होणार होती. त्याच्या एक दिवस आधीच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूकीला स्थगिती दिली. तसेच आसाम उच्च न्यायालयानेही निवडणूकीला स्थगिती दिली. त्यामुळे ही स्थगिती उठवण्यासाठी आणि भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.

Tags:    

Similar News