सामाजिक संदेश देत संगमनेर सायकल फेडरेशनच्या सदस्यांचा 125 किलोमीटर प्रवास

सामाजिक संदेश देत संगमनेर सायकल फेडरेशनच्या सदस्यांचा संगमनेर ते पारनेर असा 125 किलोमीटर प्रवास केला.

Update: 2021-08-21 12:34 GMT

संगमनेर सायकल फेडरेशनचे सदस्यांनी संगमनेर तालुका ते पारनेर तालुका असा 125 किलोमीटरचा प्रवास सायकलवर करत विविध सामाजिक संदेश दिले आहेत. या प्रवासामध्ये त्यांनी साकुर गावच्या बिरोबा महाराजांचे दर्शन घेतले तसेच त्यांनी पारनेर तालुक्यातील पळशी गावाला भेट देत इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या पळशी गावाला भेट दिली. तेथील तटबंदी व गावाचा इतिहास समजून घेतला.

सायकल चालवणे शरीरासाठी उत्तम आहे असं संगमनेर सायकल फेडरेशनच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. तसेच दिवसेंदिवस डिझेल पेट्रोलचे वाढते भाव हे न परवडणारे आहेत तसेच शरीराचा व्यायाम न झाल्यामुळे अनेक व्याधी आपल्याला जडतात त्यामुळे नित्य नियमाने सायकलिंग केलं पाहीजे असा संदेश त्यांनी दिला.भर पावसात या सदस्यांनी हा प्रवास केला आहे.

Tags:    

Similar News