मेधा कुलकर्णीचं नाराजीवर स्पष्टीकरण म्हणाल्या.. संधी हवी
समाजात आपल्या लोकांसाठी काम करून काहीतरी सकारात्मक बदल आणायची इच्छा असल्याचं माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.;
चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनावरुन नाराज असल्याची पोस्ट भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली होती. त्यांची नाराजी दुर करत केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करत त्यांना या कार्यक्रमाच आमत्रण दिलं होतं. त्या कार्यक्रमात त्यांची उपस्थितीही पाहायला मिळाली.
यावर आता मेधा कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की " मा. नितीन गडकरी यांनी घरी येऊन विचारपूस केली, मा. देवेंद्र जी यांनी निरोप दिला. दोघेही पुढे वेळ देणार आहेत.
समाजात आपल्या लोकांसाठी काम करून काहीतरी सकारात्मक बदल आणायची इच्छा आहे, थोडी अधिक संधी हवी आहे, थोडा आपलेपणा... इतकेच. काही समस्यांचे पक्षश्रेष्ठी काळजीपूर्वक निराकरण करतील" असही मेधा कुलकर्णी म्हणाल्यात
यावेळी त्यांनी सहाकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार देखील मानले आहे.