MaxMahrashtra Impact: पारधी कुटुंबाची झोपडी जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात अखेर गुन्हा दाखल

पारधी कुटुंबाची झोपडी जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात अखेर गुन्हा दाखल Max Maharashtra Impact registered case against unidentified person who set fire to the hut of Pardhi family;

Update: 2021-09-12 17:06 GMT

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असणाऱ्या सावर्डे या गावातील वन विभागाच्या हद्दीत सहा महिन्यापासून राहणाऱ्या पारधी कुटुंबाची झोपडी अज्ञातांनी पेटवली होती. याबाबत मॅक्समहाराष्ट्रने ही घटना उजेडात आणली. अखेर आज या अज्ञात आरोपींच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेची दखल घेत अनेकांनी या विरोधात आपला असंतोष व्यक्त केलेला होता.

लोकप्रतिनिधींनी अद्याप पीडितांची भेट घेतलेली नाही...

खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील हे दोन्ही याच तालुक्यात वास्तव्यास असतात. सामाजिक न्याय राज्य मंत्री देखील याच जिल्ह्यातील आहेत. तरीही या तिघांनीही या पीडितांची अद्याप भेट घेतलेली नाही. लोकप्रतिनिधींची या समुदायाप्रती असलेली ही संवेदनशीलता यातून दिसून येतो.




या कुटुंबाचे अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नाही. पावसाळ्यात झोपडी जळाल्याने यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे. प्रशासनाने तात्काळ आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी पीडित तमिना पवार यांनी केली आहे.

राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे पुनर्वसन तसेच या केसच्या तपासासाठी ते पुढाकार घेणार असल्याचे मॅक्स महाराष्ट्रला त्यांनी फोनद्वारे कळवले आहे.

Full View

Tags:    

Similar News