अवघ्या १२ तासात रमाबाई नगरमधील कचरा उचलला
मॅक्स महाराष्ट्र म्हणजे इम्पॅक्ट;
मुंबई – घाटकोपर इथल्या रमाबाई नगर इथं कचऱ्याचं साम्राज्य असल्याचं वृत्त मॅक्स महाराष्ट्रनं दाखवलं होतं. त्याची दखल घेत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अखेर इथल्या कचऱ्याची उचल करून साफसफाई करण्यात आलीय.
मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलपाटे यांनी घाटकोपरच्या रमाबाई नगरमधील घाणीचं साम्राज्य आणि त्यामुळं नागरिकांना होणाऱ्या त्रासाची बातमी दाखवली होती. त्यानंतर अवघ्या १२ तासातच मुंबई महापालिकेच्या स्वच्छता विभागानं या बातमीची दखल घेतली. आणि रमाबाई नगर इथल्या डी.बी. चौकात साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावत तो भाग स्वच्छ केला. येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंगळे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,” मॅक्स महाराष्ट्राने बातमी लावल्यानंतर आज सकाळी मुबई महानगर पालिकीकडून साफसफाई करण्यात आली आहे त्यामुळे त्यांनी मॅक्स महाराष्ट्राचे आभार मानले आहेत.