"आणि माझ्या पुढील विनोदासाठी ..." प्रसिध्द टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा मोदींवर घसरली
जगप्रसिध्द टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विनोदी टीका केली असून त्यानिमित्तानं पुन्हा एकदा जगभर नेटीझन्स दोन्ही बाजूनं खवळले आहेत.;
मोदींना सार्वजनिक कार्यालयात 20 वर्षे पूर्ण केल्याबद्दल संसद टिव्हीवर मुलाखत देताना गृहमंत्री अमित शहांनी रविवारी सांगितले की ,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'हुकूमशहा' नव्हते तर देशाने पाहिलेले सर्वात लोकशाहीवादी नेते होते". या बातमीची लिंकवर मार्टिना नवरातिलोवानं "आणि माझ्या पुढील विनोदासाठी`` असं म्हणत ट्विटसोबत विदूषकी इमोटिकॉन ( clown emoticon) जोडले आहे.
And for my next joke …😳🤡 https://t.co/vR7i5etQcv
— Martina Navratilova (@Martina) October 10, 2021
मार्टिना नवरातिलोवाच्या या ट्विटमुळे जगभरातील नेटीझन्स खवळले आहेत. अनेकांना ही पोस्ट हास्यास्पद वाटली, तर काहींनी तिच्यावर फटकारले. "हे MN चे विडंबन खाते आहे का? ती भारतीय राजकारणात रस दाखवते का? अविश्वसनीय, " असे एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं.
रिहाना पॉपसिंगरनं शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलेब्रिटींनी #IndiaTogether and #IndiaAgainstPropaganda असे ट्विट करत परदेशी लोकांनी भारताच्या अंतर्गत ढवढवळ करु नये असं म्हटलं होता. यावेळी मार्टिनानं मोदींची टिंगल केल्यानंतर अनेकांनी या सेलेब्रिटींनी मागील काळात केलेल्या प्रोपागंडा ट्विटची आठवण करुन दिली आहे.