Mark Zuckerberg : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मिळणार मोठी रक्कम

Update: 2024-02-03 02:55 GMT

मेटानं जाहीर केलेल्या लाभांश योजनेमुळे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मोठी रक्कम मिळणार आहे. त्यांच्याकडे सुमारे ३५ कोटी मेटा क्लास ए आणि क्लास बी शेअर्स आहेत. त्यामुळे, फेसबुकचे सहसंस्थापक दर तिमाही सुमारे १७.५ कोटी डॉलर्स इतका लाभांश मिळवू शकतात. त्यामुळे पुन्हा पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बननार आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गला या लाभांशाचा मोठा फायदा होणार आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने ( Meta share price ) प्रथमच आपल्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

झुकरबर्गची संपत्ती झेपावली, पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनली!

मेटा शेअर्सच्या वाढीमुळे मार्क झुकरबर्गची संपत्ती झपाट्याने वाढली आहे. झुकरबर्ग पुन्हा एकदा जगातील पाच श्रीमंतांच्या यादीत सामील झाला आहे.

फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, झुकरबर्गची सध्याची एकूण संपत्ती १३९.३ अब्ज डॉलर आहे. या संपत्तीमुळे ते आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

मार्क झुकरबर्ग यांना होणारा फायदा

मार्क झुकरबर्ग हे मेटाचे सर्वात मोठे भागधारक आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे जवळपास ३५ कोटी शेअर्स आहेत. याचा अर्थ असा की त्यांना प्रत्येक तिमाहीत सुमारे १७५ दशलक्ष डॉलर्स आणि दरवर्षी ७०० दशलक्ष डॉलर्स लाभांश मिळेल.

Tags:    

Similar News