राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष
राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या पाठोपाठ आता छगन भुजबळ यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष पदावरून मराठा vs ओबीसी संघर्ष असं राजकार सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षात चाललय काय? कोण होणार प्रदेशाध्यक्ष पदाचा दावेदार?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षात बदल करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. परंतु यावर आता पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचं दिसुन येत. २१ जून रोजी विरोधीपक्ष नेत अजित पवार यांनी विरोधीपक्ष पदावरून मुक्त करत, पक्षामधील संघटनेच्या पदाची जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज पत्रकार परिषद घेत आपली खदखद व्यक्त केली आहे ते म्हणाते की "ओबीसी बद्दल नुसत बोलून चालणार नाही तर पक्षातील महत्वाची जबाबदारी त्यांच्या खाद्यावर दिली पाहिजे. आज इतर राजकीय पक्षामध्ये देखील ओबीसी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तसत राष्ट्रवादीतही अनेक ओबीसी नेते आहेत मला जबाबदारी मिळाली तर मी सुध्दा हे पद संभाळू शकतो
राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या पाठोपाठ आता छगन भुजबळ यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष पदावरून मराठा vs ओबीसी संघर्ष या पक्षात चाललय काय? कोण होणार प्रदेशाध्यक्ष पदाचा दावेदार ? हे येणाऱ्या काळात पहाव लागणार आहे.