आरक्षण नाही तर मतदान नाही, OBC कोट्यातून आरक्षणाची मागणी करत मराठा समाज आक्रमक
राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाला पुन्हा आक्रमक झाला आहे. तसेच सरकारला अल्टीमेटम दिला आहे. नेमक्या काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या? जाणून घेण्यासाठी वाचा...
राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले. त्यामुळे आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तसेच बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाने सरकारला इशारा दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण व सरसकट कुणबी प्रमाणपत्र दया, अन्यथा नो आरक्षण नो वोट यानुसार निवडणुकांवर बहिष्कार टाकू, असा इशारा बीड मराठा क्रांती महामोर्चाने दिला आहे. बीडच्या शिरूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौका पासून सुरुवात झालेला मोर्चा तहसीलदार धडकला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी झाला होता.
सकल मराठा समाजाच्या समाजाच्या तरुणींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मुलींनी मराठा समाजाची भूमिका मांडली. यावेळी सरकार विरोधात तीव्र संताप पहायला मिळाला. या पूर्वीच्या सरकारने फसव आरक्षण दिलं आता त्याला मराठा समाज बळी पडणार नाही. आता आरक्षण देताना ओबीसी आरक्षणातील 50 टक्क्याच्या आत आरक्षण द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच यावेळी 50 टक्के एकदम ok अशा घोषणा देण्यात आल्या.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होतांना दिसत आहे.