Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठीआणखी एका युवकाचं बलिदान

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील काही महिण्यापासून मराठा समाज आक्रमक झाला आहे. विविध ठि कँडल मार्च, साखळी आंदोलन, आरक्षणाचा मराठा समाजाला होणारा फायदा या संदर्भात जनजाग्रृती सुरू आहे. अशातच आता नांदेडमधील एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन दिवाळीत विष पिऊन आयुष्य संपवले असल्याची माहिती समोर आली आहे.;

Update: 2023-11-13 13:10 GMT

Nanded : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. मनोज जरांगेंच उपोषण सोडवण्यात सरकराल यश आलं असलं तरी. तरूणाच्या आत्महत्येची प्रकरणं थांबता थांबत नाहीत. .यातच पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दाजीबा रामदास कदम (वय २३) असं मराठा तरुणाचं नाव आहे. मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील हा चौथा बळी ठरला असल्यांच ही समजतंय .

नांदेड शहराच्या झेंडा चौक येथे दाजीबा कदम याने शनिवारी दुपारी विष घेतले होते. तिथेच तो बेशुद्ध अवस्थेत पडला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा रविवार १३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर मुजोर प्रशासनाला असे किती बळी हवेत? असा संतप्त सवाल मराठा समाजाने केलाय.

Tags:    

Similar News