मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, समाजाला न्याय मिळावा: अशोक चव्हाण

न्यायालयीन प्रक्रीयेत अडकलेल्या मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भुमिका आहे, हा राजकीय विषय नाही असे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहे.;

Update: 2020-12-02 12:24 GMT

मंत्रीमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. या बैठकीत गेल्या 10-12 दिवसातील हायकोर्टाचे निर्णय आले आहेत. त्यावर चर्चा झाली.

EWS किंवा SCBC या दोघांपैकी एक काहीतरी घ्या, असे कोर्टाने म्हटलं आहे. त्यातील सारांश तरी तेच सांगत आहे. त्यामुळे हायकोर्टाचे निर्णय, EWS बद्दलच्या मागण्या आणि उर्वरित काही मागण्या याबाबत चर्चा झाली," असे अशोक चव्हाण म्हणाले.

तसेच "सुप्रीम कोर्टात चार वेळा लेखी दिलं आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत याला चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील मदत करत आहेत," असेही स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले.

Tags:    

Similar News