मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कोरोना काळात आपली भूमिका मवाळ घेतल्याची टीका काही नेत्यांनी केली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत आज आपली भूमिका मांडली.
या दरम्यानच्या काळात संभाजीराजे यांनी मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर आज आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.
यावेळी खासदार संभाजीराजे यांनी सरकारसमोर 5 पर्याय ठेवले. या तीन पर्यायावर सरकार ठोस निर्णय घेतला नाही तर आपण सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनी पुढची भूमिका स्पष्ट करु असा इशारा सरकारला दिला आहे.
पाहा काय म्हटलंय संभाजी राजे भोसले यांनी