मराठा आरक्षणासाठी वकिलांची दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक

मराठा आरक्षणासंदर्भात वकिलांची दिल्लीत होणार महत्त्वपुर्ण बैठक, बैठकीत काय होणार? कोणते वकील राहणार उपस्थित वाचा...;

Update: 2021-01-10 13:31 GMT

मराठा आरक्षणासंदर्भात वकिलांची दिल्लीत होणार महत्त्वपुर्ण बैठक, बैठकीत काय होणार? कोणते वकील राहणार उपस्थित वाचा...सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

सोमवारी सायंकाळी ५ वाजता नवीन महाराष्ट्र सदनामध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत.

मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत.

मराठा आरक्षणाबाबत येत्या २५ जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनितीवर अंतिम हात फिरवत असून, आजवर झालेल्या तयारीची समिक्षा केली जाते आहे.

Tags:    

Similar News