राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त १० जून ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने "एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी" ही मोहीम हाती घेतली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी माहिती दिली आहे.
'मराठा समाजाला' आरक्षण मिळावे म्हणून आपण एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहोत. आपण पण युवकांच्या उज्वल भविष्यासाठी एक पत्र लिहावे. ही मोहीम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वर्धापन दिनाच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्रभरातून राबवत आहोत!