मराठा मोर्चावर लाठी चार्ज नंतर बसेसची जाळपोळ

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाल्यामुळे राज्यातील अनेक भागात उद्रेक झाला आहे..;

Update: 2023-09-02 02:33 GMT

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या अमरन उपोषणाच्या आंदोलनात ठिकाणी लाठीचार्ज झाल्यानंतर आता राज्यातील अनेक भागात उद्रेक झाला असून एस टी महामंडळाच्या बसेस जाळण्याचे प्रकार घडले आहेत प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट...

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवली या गावातील मनोज जरांगे यांनी दोन दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शहागड येथे रस्ता रोको केला होता त्यानंतर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सराटी अंतर्वली या ठिकाणी केलं मात्र शासनाने त्यांना हे आंदोलन मागे घ्यावं अशी मागणी केली मात्र त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं आहे हे कुणाच्या बापाचं नाही असं म्हणत त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं नाही.

पोलीस प्रशासन आणि सराटी अंतरवली येथील नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्याचं रूपांतर लाठी चार्ज मध्ये झालं लाठीचार्ज झाल्यानंतर जवळपास शहागड येथे चार बसेस पेटवण्यात आल्या तर संभाजीनगर व जालना या महामार्गावर पाच बसेस जाळण्यात आल्या .त्यामुळे या बसेस मध्ये असणाऱ्या प्रवाशांची धांदल उडाली तर जे जालना बारामती गाडीचे चालक होते विजय सस्ते त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी बातचीत केली.




प्रत्यक्षात जे वाहनचालक होते त्यांनी एक आपबिती सांगितली त्यामध्ये सांगितले की आम्हाला बसवर दगड फेक होणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर मी लागलीच शहागड येथील बसस्थानकामध्ये टाकली त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी असलेल्या जमावाने प्रवासी उतरल्याबरोबर बसवर दगडफेक केली व बस पेटवण्यात आली मी माझा जीव वाचवत कसा बसा बाहेर निघालो आणि बस पेटवण्यात आल्या की दृश्य आपल्यासमोर आहेत.


Tags:    

Similar News