....तर मराठा मोर्चा मंत्रालयावर धडकणार : राजेंद्र कोंढरे
येत्या १ डिसेंबरला जिल्ह्यातील विविध महावितरण कार्यावर मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मराठा समजाच्या अन्य मागण्या पुर्ण कराव्या जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मंत्रालय वर ८ तारखेला धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती मराठा मोर्चाचे समनव्यक राजेंद्र कोंढरे यांनी दिली
येत्या १ डिसेंबरला जिल्ह्यातील विविध महावितरण कार्यावर मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मराठा समजाच्या अन्य मागण्या पुर्ण कराव्या जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मंत्रालय वर ८ तारखेला धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती मराठा मोर्चाचे समनव्यक राजेंद्र कोंढरे यांनी दिली.
मराठा क्रांती मोर्चाची आज पुण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राजेंद्र कोंढरे आणि अन्य मराठा मोर्चाचे समनव्यक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रामुख्याने महावितरणाच्या परीक्षेसाठी पास झालेल्या SEBC च्या प्रवर्गातील मुलांचा यादी यावेळी नितीन राऊत यांचाकडे पाठवण्यात आली होती. याची मान्यता प्राप्त करण्यासाठी संभाजीराजे यांनी देखील राऊतांना पत्र लिहिलं होतं. पण नियुत्या देण्याच्याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घुमजाव केल्याचा आरोप मराठा मोर्चानं केला आहे.
तब्बल यामध्ये साधारण साडेपाचशे मुलांची यादी ही प्रोसेस मध्ये होती पण ती नावे या ठिकाणी वगळण्यात आली. याकरिता हि भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करा अन्यथा १ तारखेला जिल्ह्यातील विविध महावितरण कार्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मराठा समजाच्या अन्य मागण्या पुर्ण कराव्या जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मंत्रालय वर ८ तारखेला धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती मराठा मोर्चाचे समनव्यक राजेंद्र कोंढरे यांनी दिली.