मराठा समाजाला 'ओबीसी'मधून आरक्षण हवे; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी संघटनांतर्फे मोर्चे काढले जात असताना मराठा क्रांती मोर्चाने मोठी मागणी केली आहे.;

Update: 2020-12-26 15:02 GMT

औरंगाबाद : ईडब्ल्यूएस मधील आऱक्षण मराठा समाजाला कधीच मान्य राहणार नाही,त्यामुळे एस.ई.बी.सी आरक्षण टिकवा नाहीतर ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण द्या अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. शनिवारी याबाबत औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.

सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी भूमिका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची आहे. त्यामुळे चव्हाण यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्या जागी एकनाथ शिंदे किंवा इतर नेत्याची नेमणूक करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

तर एक जानेवारीला औरंगाबादमध्ये आक्रोश मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात बाबत 25 तारखेला होणाऱ्या सुनावणीवेळी योग्य निर्णय आला नाही, तर राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिला.

Tags:    

Similar News