मराठा आरक्षण मिळण्याची अजूनही संधी: विनोद पाटील

Update: 2021-05-05 09:44 GMT

आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाजामध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते अॅड. विनोद पाटील यांच्याशी आम्ही बातचीत केली असता, राज्य सरकारने आता इतर पर्यायाची चाचपणी करावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तसंच यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत बोलताना न्यायालय एकीकडे आरक्षण मान्य करत नाही, तर दुसरीकडे एक भाग मान्य करते, त्यामुळे मराठा आरक्षण मिळण्याची अजूनही संधी आहे. असं मत विनोद पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News