मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव, संजय पांडे मुंबईचे पोलिस आयुक्त
राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या जागी मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.;
राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती हे 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी अटीतटीच्या स्पर्धेतून मुख्य सचिव पदासाठी मनु कुमार श्रीवास्तव यांची निवड झाली.
कोरोना महामारीच्या संकटात माजी मुख्य सचिव देबाशिष चर्कवर्ती यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी माहणी राज्य सरकारने केली होती. मात्र केंद्र सरकारने देबाशिष चक्रवर्ती यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यानंतर राज्य सरकारने 1686 बॅचचे आयएएस अधिकारी मनु कुमार श्रीवास्तव यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती निवृत्त झाल्यानंतर मुख्य सचिव पदासाठी मनु कुमार श्रीवास्तव हे गृह विभागातून, सुजाता सौनिक या सेवा विभागातून, मनोज सौनिक हे अर्थ विभागातून तर नितीन करीर हे महसूल विभागातून चर्चेत होते. तर या अटीतटीच्या स्पर्धेत मनु कुमार श्रीवास्तव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
वयाच्या 22 व्या वर्षी मनु कुमार श्रीवास्तव यांची भारतीय पोलिस सेवेत निवड झाली होती. तर 1986 साली आयएएस अधिकारी बनले. तर राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी त्यांच्या सेवाजेष्ठतेला प्राधान्य देत त्यांची निवड करण्यात आली. तर मनु कुमार श्रीवास्तव हे आपल्या कामासोबतच गायनासाठीही प्रसिध्द आहेत. त्यांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी अनेक गाणी गायली आहेत.
राज्याचे माजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांची 30 नोव्हेंबर 2021 रोजी राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 28 नोव्हेंबर रोजी चक्रवर्ती निवृत्त होत असल्याने त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. मात्र केंद्र सरकारने राज्य सरकारची मागणी फेटाळली. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवपदी मनु कुमार श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली.
कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त :
महाविकास आघाडी सरकावर १०० कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करत त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता हेमंत नगराळे यांना संजय पांडे यांच्या जागी राज्य सुरक्षा महामंडळात नियुक्त करण्यात आली आहे. तर संजय पांडे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियु्क्ती करण्यात आली आहे. मात्र सेवाजेष्ठतेनुसार संजय पांडे यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली.