मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत आज मोठी बैठक...!

Update: 2024-03-24 06:46 GMT

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटीमध्ये राज्यातील मोठी बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे यावर चर्चा करून ठरवले जाणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण मानली जात असून या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या राज्यव्यापी बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रनेचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सूरू आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्यसरकारकडून दहा टक्के आरक्षण देण्याचा सुध्दा निर्णय झाला. परंतू सरकारने दिलेल्या या निर्णयाचा विरोध करत मराठा समाजाच्या वतीने सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावं, ही प्रमुख मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे.

याच परिस्थितीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामूले राज्यात आता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या पुढील आंदोलनाची व लोकसभा निवडणूकीत मराठा समाजाची भूमिका ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये या राज्यव्यापी महाबैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार असून या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुले आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.  

Tags:    

Similar News