पीएम केअर फंडमध्ये 2.5 लाख दान करुन आईसाठी मिळाला नाही बेड, आईच्या मृत्यूनंतर मुलगा म्हणाला...

Update: 2021-05-25 13:04 GMT

कोरोना साथीच्या नावाखाली सुरू केलेला पंतप्रधान साहाय्यता निधी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अगोदर पीएम केअरच्या पारदर्शकतेवर सुद्धा बरेच प्रश्न निर्माण झाले होते, गेल्या वर्षी आरटीआय अधिकारक्षेत्रात पीएम केअर फंड येत नसल्याने देखील लोकांनी यावर सवाल उभे केले होते. तेव्हा सरकारने सर्वोच्च न्यायालयात पीएम केअर फंड हा पब्लिक अथॉरिटी नाही. असं म्हणत प्रश्न टाळला होता.

या प्रकरणावर मोदी सरकारच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते की "पीएम केअर मध्ये ज्यांनी एक रुपयाही जमा केला नाही ते लोक कसला हिशोब मागतायत, मात्र यावेळी चक्क मोदी सरकारच्या एका कट्टर समर्थकानेच हिशोब मागितला आहे.

सध्या अहमदाबादमधील रहिवासी तसेच कट्टर मोदी समर्थक असलेल्या रमेशभाई विजय पारीख यांचं एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोरोनामुळे त्यांनी त्यांच्या आईला गमावलं आहे. दुःख व्यक्त करत त्यांनी एक ट्विट केलं आहे, ज्या ट्वीटमध्ये पीएम केअर फंडमध्ये अडीच लाख रुपये जमा केल्याचा एक स्क्रीनशॉटही दिसून येतो.

त्यांच्या ट्विट मध्ये ते लिहितात -

2 लाख 51 हजार रुपयांची देणगी देऊनही माझ्या आईला रुग्णालयात बेड मिळाला नाही. कृपया मला सांगा की कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत बेड मिळवण्यासाठी मला आणखी किती रुपये दान द्यावे लागतील, जेणेकरुन मी माझ्या कुटुंबातील आणखी एक सदस्य गमावण्यापासून वाचवेल. विजय यांनी हे ट्वीट पीएमओ, राजनाथ सिंह, आरएसएस, स्मृती इरानी आणि राष्ट्रपती भवनला देखील टॅग केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी या प्रकरणाबद्दल फेसबुक पोस्ट केली आहे, त्यामध्ये ते म्हणतात...

अहमदाबादचे रमेशभाई विजय पारीख यांनी पीएम केअर फंड मध्ये अडीच लाख रूपये दान केले होते. त्याच्या आईला रुग्णालयात बेड मिळाला नाही. ते लिहितात की कृपया तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी किती दान द्यावे लागेल ते सांगा.

Full View

विजय परिख यांची ट्विटर टाइमलाइन पाहिल्यास ते जवळपास एक दशकापासून ट्विटर वापरत असल्याचं दिसून येतं. ट्विटरवर ते कमी प्रमाणात Active असतात. मात्र, त्यांनी जेव्हा केव्हाही ट्विटरवर पोस्ट केल्या आहेत. तेव्हा त्या फक्त मोदीं सरकारच्या निर्णयाचे कौतुक करणाऱ्याचं आहेत. नोटाबंदीच्या निर्णयावर "काळ्या पैशासाठीचा सर्जिकल स्ट्राइक" असं ट्विट त्यांनी केले आहेत.

त्यांच्या एका ट्विटमध्ये तर त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींपासून प्रेरित असल्याचं वर्णन केलं होते. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होत की -

"ट्रम्प हे मोदींपासून प्रेरित आहेत - यावेळी ट्रम्प सरकारचं येणार"

आत्तापर्यंत विजय पारीख यांच्या ट्विटवर 33 हजाराहून अधिक लाईक्स, 14 हजाराहून अधिक ट्वीट आणि सुमारे अडीच हजार कमेंट्स आल्या आहेत.

अनेक ट्विटर युजर्स पारीख यांना पैसे परत घेण्याचा सल्ला देत आहेत, मात्र विजय पारीख यांनी उत्तर देत म्हटलं आहे -

"हा पैशाचा मुद्दा नाही. मी माझे सर्व पैसे दान करेल. जर मला कोणी याची शाश्वती दिली की... कोणालाही परत असा त्रास होणार नाही. माझ्यासारखे आणखी कित्येक लोक असतील. ते अशा प्रकारे दान करतील...''

Tags:    

Similar News