मोदींना 'सुपर कॉम्प्यूटर` म्हणणाऱ्या अधिकाऱ्याला लागली युनेस्कोमध्ये भारताच्या राजदूतपदाची लॉटरी
केंद्रामध्ये सत्तेवर आल्यापासून गुजरातच्या सनदी अधिकाऱ्यांचा दिल्लीच्या सत्तेत बोलबाला असताना आता विशाल व्ही. शर्मा या गुजरातमधील विशेष कर्तव्यावर असलेले नरेंद्र मोदींचे अधिकारी जे होलोग्रामद्वारे आयोजित केलेल्या त्यांच्या जाहीर सभांचे शिल्पकार होते आणि त्यांनी मोदींचा गौरव 'सुपर कॉम्प्यूटर' म्हणून केला होता त्यांना आता युनेस्कोमध्ये भारताचे राजदूत म्हणून नेमले गेले आहे.
केंद्रातले पुरोगामी संयुक्त आघाडीचे सरकार पायउतार होऊन नरेंद्र मोदींचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार २०१४ मधे आल्यापासून गुजरात केडरच्या सनदी अधिकाऱ्यांच्या मोक्याच्या महत्वांच्या पदावर नियुक्त्या होत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सांस्कृतिक संघटनेत भारताचे दूत म्हणुन विशाल व्ही. शर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते नरेंद्र मोदी यांच्याकडे विशेष कर्तव्यावर अधिकारी (OSD) होते.
सध्याचे राजदुत जावेद अशरफ यांची मुदत संपल्याने त्यांनी जागी युनेस्को, पॅरिस येथे स्थायी प्रतिनिधी मंडळाचे भारतीय स्थायी प्रतिनिधी म्हणून शर्मांना नियुक्त केले गेले आहे. त्यांनी लवकरच ही जबाबदारी स्वीकारतील अशी घोषणा परराष्ट्र मंत्राययाने केली असून घोषणेनंतर काही तासांनंतर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी अभिनंदन ट्विट देखील केले आहे.
गुजरातमधील मुख्यमंत्री असताना मोदी सरकारच्या सुरुवातीच्या वर्षांत शर्मा हे भाजपामधील संपर्कतज्ञ होते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदाबादमधील पत्रकारांनी मोदींच्या जाहीर सभांमागील शिल्पकार असं म्हटलं आहे. त्याच्याबद्दल फारशी सार्वजनिक माहिती नाही. आणि युनेस्कोमध्ये त्यांची राजदूतांची नेमणूक त्यांच्या 'सांस्कृतिक राष्ट्रवादाशी' जोडली असल्यांचे सांगितलं जात आहे.
"5ऑगस्ट हा एक सभ्यतेचा दिवस आहे, कदाचित 15 ऑगस्ट राजकीय सत्तांतर दिनापेक्षा मोठा, कारण ५ ऑगस्टला भारतीय संस्कृतीच्या स्वातंत्र्याचा खरा आत्मा साध्य होईल," असे त्यांनी राम मंदिराच्या पायाभरणीच्या दिवशी सांगितले. १1992 मध्ये हिंदुत्ववाद्यांनी उद्ध्वस्त केलेल्या बाबरी मशिदीच्या जागेवर मंदिर निर्माण हा राक्षसीवृत्तीवर प्रभुरामाचा विजय असल्याचे विशाल शर्मांनी म्हटलं होतं. "
यापूर्वी 2017 मध्ये भारत सरकारच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. बीपीसीएलच्या वार्षिक अहवालानुसार, फ्री प्रेस हाऊस लिमिटेडमध्ये त्यांचे संचालक देखील होते. वार्षिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे त्यांची शैक्षणिक पात्रता आय.आय.एम. (कलकत्ता) येथील बॅचलर ऑफ सायन्स (फिजिक्स) आणि बिझिनेस मॅनेजमेंट इन एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम या आहेत. त्यांच्या लेखी प्रकाशनांच्या शोधामुळे एप्रिल 2015 मध्ये वर्ल्ड हिंदू न्यूज, वेबसाइटवर एक लेखात त्यांनी मोदींचा गौरव करत "असामान्य सुपर कॉम्प्युटर भारतीय पंतप्रधान" असे वर्णन केलं होतं.