मुंबईत 26/11 प्रमाणे हल्ल्याची धमकी, पाकिस्तान वरून आला मेसेज
मुंबईत 26/11 प्रमाणे हल्ल्याची धमकी, पाकिस्तान वरून आला मेसेज, काय आहे संपुर्ण मेसेज वाचा;
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानच्या एका नंबरवरून २६/११ प्रमाणे हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे.
संपूर्ण देशात जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात असताना शुक्रवारी रात्री 11 वाजता मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एकापाठोपाठ एक अनेक मेसेज आले आहेत. यामध्ये २६/११ सारख्या हल्ल्याने मुंबई हादरवणार असल्याचे म्हटले आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता.
पाकिस्तानचा कोड असलेल्या नंबरवरून पाठवलेल्या मेसेजमध्ये मुंबईवर लवकरच हल्ला होणार असून 26/11ची आठवण करून दिली जाईल, असे म्हटलं आहे.
हा मेसेज मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एका बोटीत तीन एके-४७ रायफल्सचे सापडल्या होत्या. हे प्रकरण ताजं असताना शुक्रवारी रात्री मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सअॅपवरून पाकिस्तानी क्रमांकावरून धमकी आली आहे.
काय आहे संदेश?
मुंबईत 26/11 च्या धर्तीवर लवकरच हल्ला करणार, असे या धमकीत म्हटले आहे. आम्ही मुंबई उडवण्याच्या तयारीत आहोत. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो पाकिस्तानचा असल्याचेही नमूद केले असून काही भारतीय लोक त्याच्यासोबत आहेत. ज्यांना मुंबई उडवायची आहे. धमकीच्या मेसेजमध्ये भारतातील काही लोकांची नाव देखील पाठवण्यात आली आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी आहे, फक्त काही वेळ बाकी आहे. हल्ला कधीही होऊ शकतो.
26/11 चा हल्ला तुम्हाला आठवत असेल, आठवत नसेल तर तो पुन्हा पाहिला तर बरं होईल. आमचा ठावठिकाणा नाही, आमचे लोकेशनही तुम्हाला देशाबाहेर ट्रेस होईल. हल्ला मुंबईतच होणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला भारताचे क्रमांक दिले आहेत. काही मेसेज मध्ये राजस्थानच्या उदयपूरसारखे प्रकरणही घडू शकते. उदयपूरमध्ये कन्हैया लाल दर्जी यांची हत्या करण्यात आली होती. त्याप्रमाणे काही प्रकरण घडू शकतात. आमचं लोकशन पाकिस्तान असलं तरी हल्ला मुंबईत होईल.
असं या संदेशात म्हटलं आहे.
या धमकीच्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये पंजाबमधील सिद्धू मूसवाला हत्येचाही उल्लेख करण्यात आला आहे. धमकीमध्ये म्हटले आहे की, एक ओसामा, एक अजमल कसाब आणि एक अल-जवाहिरी मरण पावला, अजूनही अनेक अल-जवाहिरी आहेत.
असंही या संदेशात म्हटलं आहे.
मुंबई पोलिसांचा सायबर सेल पाकिस्तानच्या कोड क्रमांक +923029858353 वरून पाठवण्यात आलेल्या धमकीच्या संदेशांची चौकशी करत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ज्या क्रमांकावरून धमकीचे व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले गेले आहेत तो पाकिस्तानचा आहे. व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये नमूद केलेले भारतीय क्रमांक पोलिस आता ट्रेस करत आहेत.
दरम्यान या मेसेजनंतर मुंबईसह देशात सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून मुंबईत आगामी सणांच्या दृष्टीकोनातून सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर आली आहे.