महावितरण कर्मचारी संपावर, सव्वाशे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सातारा जिल्ह्याची भिस्त

सरकार अदानी समूहाला वीज वितरणाचा परवाना देत असल्याने राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी तीन दिवस संपावर आहेत. त्यापार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्याची कमान सव्वाशे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असणार आहे.;

Update: 2023-01-04 02:21 GMT

महावितरणमध्ये (Mahavitaran) समांतर अशा धोरण अंमलबजावणीमुळे सातारा (Satara) मंडळातील वीज वितरण कंपनीचे कायमस्वरूपी असणारे 2700 अभियंते अधिकारी कर्मचारी आजपासून संपावर (Mahavitaran Worker on Strike) आहेत. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीने मंगळवार मध्यरात्रीपासून 72 तासाचा संप पुकारला आहे. त्यामुळे जर पुढील 72 तासांमध्ये जर कुठे वीजपुरवठा खंडित झाला, तर तो पूर्ववत करताना वीज वितरणच्या यंत्रणेला मोठी कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्ध पातळीवर 24 तासांच्या तयार राहणार आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड (Electric Engineer Gautam Gaikwad) यांनी केले आहे.

महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Vijay Singhal) व संचालक संजय ताकसांडे (Sanjay Taksande) यांनी संपाच्या पार्श्वभुमीवर आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत परिमंडल कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध उपाय योजना राबवण्यात येणार आहेत. विभाग मंडळ-परिमंडल स्तरावर 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष युद्ध पातळीवर तयार करण्यात आला असून दर तासाला वीज पुरवठ्याच्या स्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी मुख्यालयाला अहवाल सादर करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील अभियंता वीज कर्मचारी, अधिकारी असे 2700 कर्मचारी खाजगीकरणाच्या विरोधात संपावर जात असल्याने पुढील 72 तास वीज पुरवठ्याचा खोळंबा झाल्यास त्याची तातडीची दुरुस्ती होऊ शकेल की नाही याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे या संपाचे परिणाम सातारा जिल्ह्यातील विशेषता औद्योगिक वसाहत असलेल्या शिरवळ तासवडे MIDC तील लघुउद्योगांना बसू शकतो. त्यामुळे 72 तासात मोठे नुकसान होण्याची भीती उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.

संपामध्ये महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणचे अप्रेंटिस विद्युत सहाय्यक प्रशिक्षणार्थ, अभियंता देखभाल दुरुस्ती करणाऱ्या निवड सूची वरील कंत्राटदारांचे कर्मचारी हे सहभागी झाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात गौतम गायकवाड यांनी वीज पुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या केल्या आहेत. बाह्य स्त्रोत कंत्राट तत्वावर सक्रिय असलेले बाराशे कर्मचारी सुद्धा या संपामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे संप काळामध्ये सुरळीत वीज पुरवठ्यासाठी प्रत्येक विभागात निवड सूचीवर असलेल्या कंत्राटदारांना आवश्यक साधनसामग्री मनुष्यबळ वाहनासह संबंधित कार्यालयामध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. महावितरणच्या मंडल प्रमुखांकडून उपकेंद्रांसाठी वितरण रोहित्र ऑइल विस्तार केबल, स्वीच काम, फिडर पिलर्स डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस ही साधनसामग्री पुरविण्यात आली आहे. 

Tags:    

Similar News