बीड जिल्ह्यात कमी झालेले कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने, जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत. मात्र असं असताना बीडमधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी, चक्क डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी बेभान होऊन कोरोणाचे नियम पायदळी तुडवले गेले. यावेळी एकाच्याही तोंडाला मास्क नव्हते, तर सोशल डिस्टनसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता.बीडच्या कपिलधार परिसरात ट्रेकिंगच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून हुल्लडबाजी करत ,भर रस्त्यात डीजेच्या तालावर धांगडधिंगा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियम नाहीत का ? नियम फक्त सामान्यांना आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, त्यामुळे आता जिल्हाधिकारी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का ? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे......