महाराष्ट्राची बस नर्मदा नदीत कोसळली, म.प्रदेशात अपघात

Update: 2022-07-18 07:49 GMT

मध्य प्रदेशातील धारहून अमळनेरला निघालेल्या एसटी बसला अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात या बसला हा भीषण अपघात झाला. धारहून ही बस सकाळी अमळनेरला निघाली होती. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू जागीच झाला आहे. बसमध्ये अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाचा कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली.

दरम्यान बसमधील १५ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. ही बस सोमवारी सकाळी साडे वाजता धारहून अंमळनेरकडे निघाली होती. पण पुढे निघाल्यानंतर कठडा तोडून बस नर्मदा नदीत कोसळली. अपघातग्रस्त बसमध्ये ५५ प्रवासी होते अशी माहिती मिळते आहे. जखमींना जवळच्या धामनोद हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन या अपघाताबद्दल माहिती दिली आहे.

"इंदोर-अमळनेर ही ST बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो."

असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करुन या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News