दहावीचा निकाल इथं पाहा: ४ स्टेप्स आणि निकाल तुमच्या हातात!

दहावी परीक्षेचा निकाल कसा पाहाल, दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी लिंक... Maharashtra Secondary School Certificate Varsha Gaikwad SSC Result Link;

Update: 2021-07-16 05:58 GMT

राज्यातील दहावीचा निकाल आज शुक्रवार दि. 16 जुलै ला दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

कुठं पाहायला मिळणार निकाल? (SSC Results 2021)

विषयनिहाय संपादित केलेले गुण

http: //result.mh-ssc.ac.in

या सकेतस्थळावर पाहता येणार आहेत. तसंच या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.

मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in असे आहे.

शाळांना एकत्रित निकाल कुठं मिळेल?

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

10 वीचं मूल्यमापन कसं करण्यात आलं आहे?

सन 2021 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इ. 9 वीचा अंतिम निकाल, 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ.10 वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळामार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली.

दहावीचे एकूण विद्यार्थी

सन 2021 च्या इयत्ता दहावीत एकूण मुले- 9 लाख 9 हजार 931 प्रविष्ट होते, तर मुली -7 लाख 78 हजार 693 असे एकूण- 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी प्रविष्ट होते. एकूण आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत.

राज्य मंडळ स्तरावर दि.3 जुलै 2021 ते दि. 15 जुलै, 2021 अखेर या दरम्यान मंडळामार्फत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.

Tags:    

Similar News