खान्देशात पावसाला सुरवात: शेतकऱ्यांमध्ये आनंद - राज्यातही पावसाला सुरुवात
दुष्काळाच्या छायेत असलेल्या खान्देशात पावसाने पुनरागमन केलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या गडद छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात पाऊस सक्रिय:
खान्देश आणि पश्चिम विदर्भातील तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुलनेने पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आधीच कमी पाऊस झाल्याने या भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यातच पावसाने खंड दिल्याने शेतकरी अजूनच संकटात सापडला होता.
आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येत्या 2-4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता. तर अनेक ठिकाणी पावसाअभावी दुबार पेरणीच्या संकटाना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते.
आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येत्या 2-4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या अंदाजाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून हा पाऊस खरिपाच्या पिकांना जीवदान ठरणार आहे.
काही ठिकाणी अतिवृष्टी तर कुठे पावसाअभावी दुबार पेरणी असे परस्परविरोधी चित्र मागच्या महिन्यात होते. परंतु आता पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. तसेच, कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता.