MPSC Group C Admit Card 2022 released: एमपीएससीच्या गट – क परीक्षेचे हॉल तिकिट असे करा डाऊनलोड

Update: 2022-10-28 07:50 GMT

MPSC Group C Admit Card 2022: महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) च्या महाराष्ट्र गट-क ची संयुक्त परीक्षा 2022 साठी प्रवेशपत्र द्यायला सुरूवात केली आहे. परीक्षा देणारे उमेदवार एमपीएससीच्या mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. या परिक्षेसंदर्भात कुठल्याही प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी उमेदवारांनी वरील वेबसाईटचा आधार घ्यायचा आहे.

MPSC च्या गट – क ची पूर्वपरीक्षा ही येत्या ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. जाहिरात क्रमांक 077/2022 नुसार गट – क साठी महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांसाठी 228 पदांची भरती करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेलेच उमेदवार फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये गट-क साठी होणा-या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील..

MPSC च्या गट – क च्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (MPSC Group C hall ticket रेलेअसेद ) डाऊनलोड कऱण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा.

सर्वात पहिल्यांदा MPSC च्या mpsconline.gov.in या वेबसाईटवर जा

वेबसाईटवर गेल्यावर Log In या टॅब वर जा

तुमचा अधिकृत E-mail ID किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्डच्या मदतीने Log in करा

Log in झाल्यावर हॉल तिकिट च्या लिंकवर क्लिक करा

MPSC Group C Hall Ticket तुम्हांला स्क्रीनवर दिसेल

हॉल तिकिट डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊट काढून तुमच्याजवळ ठेवा

परीक्षा केंद्रावर प्रवेश करतांना हे हॉल तिकिट जवळ ठेवा 

Tags:    

Similar News