Maharashtra Political Crisis विधानसभा अध्यक्ष बजावणार शिवसेना आमदारांना नोटीस
Maharashtra Political Crisis : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदारांना नोटीस बजावणार आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार तसंच ठाकरे गटाच्या 14 आमदारांना ही नोटीस बजावण्यात येणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात येईल. अपात्रतेविरोधातली कारवाई टाळण्यासाठी या सर्व आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसंच आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदतही देण्यात येणार आहे.. निवडणूक आयोगाने याआधी विधीमंडळाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली होती. तेव्हा विधानसभा अध्यक्षही शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.