राज्यात कोरोनाचा विस्फोट: 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोद

राज्यात बुधवारी दिवसभरात 31 हजार 855 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 15 हजार 098 जण कोरोनामुक्त झाले आहे.

Update: 2021-03-24 15:23 GMT

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्येही रुग्णसंख्येच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. असं असतानाही कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे.

कोरोनाची बाधा झालेल्या एक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या १० जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ९ जिल्हे तर कर्नाटकमधील एका जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद नांदेड, जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात बुधवारी दिवसभरात 31 हजार 855 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 15 हजार 098 कोरोनामुक्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपेक्षा आज मृतांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25 लाख 64 हजार 811 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 53 हजार 684 जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags:    

Similar News