Chhagan Bhujbal Corona Positive : छगन भुजबळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.;

Update: 2023-03-28 06:56 GMT

राज्यात कोरोना रुग्णांची (Covid 19) संख्या वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे.

सोमवारी छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर होते. (Chhagan Bhujbal Nashik Visit) दरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे छगन भुजबळ यांना अपोलो रुग्णालयात (Apolo Hospital) नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांची छगन भुजबळ यांची कोरोना तपासणी केली. त्यामध्ये छगन भुजबळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. (Chhagan Bhujbal tested corona)

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, छगन भुजबळ यांना कोरोना रुग्णांची लागण झाली आहे. मात्र प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. यापुर्वीही छगन भुजबळ यांना दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती. 

Tags:    

Similar News