महाराष्ट्रावर संकटावर संकट, कोव्हिड हॉस्पिटलला आग, आगीत ४ लोकांचा मृत्यू
मुंबई, भंडारा येथील लागलेल्या आगीतून आपण काय धडा घेतला?;
मुंबई, भंडारा येथील लागलेल्या आगीतून आपण काय धडा घेतला असा सवाल उपस्थित झाला आहे. नागपूरमध्ये वेल ट्रीट या खासगी कोव्हिड हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत चार रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २७ रुग्णांना ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
या आगीत ४० पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार फायर ऑडीटशिवाय हे हॉस्पिटल चालवले जात होते. काही दिवसांपुर्वीच भांडूपमधल्या एका मॉलमधील रुग्णालायाला भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर भंडारा येथे लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यूने देश हळहळला होता. मात्र, या घटनांमधून महाराष्ट्राने कोणता धडा घेतला. असा सवाल आता उपस्थित होत आहे.