महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या संकटात असतांना केंद्राकडून दुजाभाव - डॉ. शिंगणे

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असतांना या संकट काळात केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळण्याची अपेक्षा असताना केंद्राकडून मात्र दुजाभाव केला जात असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादीच्या कोरोना योध्दा सन्मान सोहळ्यात बोलत होते.

Update: 2021-07-31 04:52 GMT

बुलडाणा // महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असतांना या संकट काळात केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळण्याची अपेक्षा असताना केंद्राकडून मात्र दुजाभाव केला जात असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादीच्या कोरोना योध्दा सन्मान सोहळ्यात बोलत होते.

त्यामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. केंद्राकडून राज्याला लसीचा पुरेसा पुरवठा होत नाही, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणात अडथळे येतात. राज्यात कोरोनाचा दर कमी झाला तो लसीकरण मुळेच, पण राज्यात 100% लसीकरण व्हावं यासाठी केंद्राने मदत करायला पाहिजे, पण तसे होतांना दिसत नाही. असं डॉ.शिंगणे यांनी म्हटलं आहे.

राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतांना केंद्राकडून असा दुजाभाव करणं योग्य नाही असं शिंगणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, राज्य सरकार पुर्ण तयारीत आहे असं डॉ. शिंगणे यांनी सांगितले.

आ.निलेश लंके व्यासपीठावर विना मास्क दरम्यान राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह या कोरोना योध्दा सन्मान सोहळ्याला पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते. कोरोना काळात वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत कधी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे निलेश लंके या कार्यक्रमातही व्यासपीठावर विना मास्क दिसल्याने पुन्हा चर्चेत आले आहे. निलेश लंके यांनी सुरू केलेल्या पारनेर येथील कोवीड सेंटरमध्ये देखील ते अनेकदा विना मास्क फिरताना दिसत होते. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या त्यांच्या मतदार संघात कोरोना रूग्णसंख्या प्रचंड आहे. कालच त्यांच्या पारनेरचा जिल्ह्याधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आढावा घेत त्याठिकाणी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.

Tags:    

Similar News