राज्य सरकारने ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनचे कडक निर्बंध 1 जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
राज्य सरकारने पुन्हा एकदा हा लॉकडाऊन वाढवला आहे. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर जो असंतोष मोठ्या प्रमाणात मराठा समाजात पसरलेला आहे. हा असंतोष रस्त्यावर येऊ नये, मराठा समाजाने संघर्ष करू नये. आंदोलन करू नये. मोर्चे काढू नये आणि सरकारच्या विरोधात त्यांनी भूमिका घेऊ नये. यासाठीच उद्धव ठाकरे सरकारने हा लॉकडाऊन जाणीवपूर्वक वाढवला आहे.असा दावा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.