कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्याने आता लसीकरणात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. राज्यात सोमवारी तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. "
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज आतावरची विक्रमी नोंद केली असून सायं. ६ पर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लवकरच आपण दीड कोटींचा टप्पा गाठू. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 26, 2021
यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्विट केले आहे.
महाराष्ट्रात आज तब्बल ५ लाखांहून अधिक लसीकरण झाले. हा नवीन विक्रम आहे. राज्यात आजवर सुमारे १.४८ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून, उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटींचा टप्पा गाठणारे पहिले राज्य ठरेल. लसीकरण मोहिमेत गुंतलेल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे मनःपूर्वक अभिनंदन.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 26, 2021
"महाराष्ट्रात आज तब्बल ५ लाखांहून अधिक लसीकरण झाले. हा नवीन विक्रम आहे. राज्यात आजवर सुमारे १.४८ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून, उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटींचा टप्पा गाठणारे पहिले राज्य ठरेल. लसीकरण मोहिमेत गुंतलेल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे मनःपूर्वक अभिनंदन.
महाराष्ट्राला जेवढ्या जास्त लसी मिळतील, तेवढे जास्त लसीकरण शक्य होईल. कारण त्या अनुषंगाने राज्याने यंत्रणा तयार केली आहे. आज महाराष्ट्रात तब्बल ६, १५५ केंद्रांवर लसीकरण झाले. त्यातील ५,३४७ केंद्र शासकीय होते. त्यामुळे केंद्राने लसींचा पुरवठा असाच अव्याहत ठेवावा, ही अपेक्षा."