दाभोळ ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल,भाजपचा मोठा विजय...
दाभोळ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळत 15 पैकी 10 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. दाभोळ विकास आघाडीला 10 जागा तर महाविकास आघाडीला 5 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.दाभोळ विकास आघाडीमध्ये विजयी उमेदवार उदय जावकर,समीत भाटकर, संगीता दाभोलकर, वसीमा हुसेन, राखी तोडणकर, प्रियांका मयेकर, फरमान मेहराजबी दांडेकर, अभय गोयथळे, वाहिद अली हसनमिया बालाभाई, शंकर मुरमुरे या उमेदवारांचा विजय झाला असून महाविकास आघाडीमध्ये महमद रफिक वाजुद्दीन सारंग,चंद्रकांत पारदले, नंदिनी नवजेकर,रिहाना दर्वेश, प्रतीक्षा नरवणकर या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.;
राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 479 ग्रामपंचायती असून यामध्ये 479 पैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अनेक ठिकाणी शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कोकणातील मतमोजणीचे निकाल हाती आले असून राज्यामध्ये सर्वच पक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे. कोकणामध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये मोठी चुरस दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड (15),दापोली (57) , खेड (87),चिपळूण (83,गुहागर (29),संगमेश्वर (81) रत्नागिरी (53), लांजा (23) , राजापूर (51) इ ग्रामपंचायतीचा समावेश असून रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनी बाजी मारली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाबाबत प्रतिक्रिया देत "शिवसेनेचा रत्नागिरीत वन साईड विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली. सिंधुदुर्गातही सेनेची चांगली घोडदौड सुरु असल्याचं ते म्हणाले. मात्र कोकणातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपने देखील विजय मिळवला आहे. मंडणगड तालुक्यातील 13 पैकी 2 बिनविरोध असून शिवसेनेने11 ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत बाजी मारली आहे.
एकीकडे राज्यात महविकास आघाडीचं सरकार असून येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांकडे संगळ्यांच लक्ष होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची ठरलेली दापोली तालुक्यातील दाभोळ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं होतं. दाभोळ ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार आणि आमदार यांची ताकद पणाला लागली होती. दाभोळ ग्रामपंचायत निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडीचे पॅनल तर दुसरीकडे दाभोळ विकास आघाडी आमने सामने होते. दापोली तालुक्यात काही ठिकाणी महाविकास आघाडी असून बहुतांश ठिकाणी शिवसेना,राष्ट्रवादी, भाजप, मनसे असा सामना रंगला होता. तर अनेक ठिकाणी गाव पॅनेल व मनसेही आपले नशिब आजमावले आहे.
नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार दाभोळ ग्रामपंचायत निवडणुकीत दाभोळ विकास आघाडीला 15 पैकी 10 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीला 5 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दाभोळ ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 30 उमेदवार असून 1 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रींगणात होते. दाभोळ ग्रामपंचायत निवडणूकीत दाभोळ विकास आघाडी पॅनलचे एकून 15 उमेदवार आपले नशिब आजमावत होते. यामध्ये दाभोळ विकास आघाडीने 10 जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व कायम ठेवलं. दाभोळ विकास आघाडीमध्ये विजयी उमेदवार उदय जावकर,समीत भाटकर, संगीता दाभोलकर, वसीमा हुसेन, राखी तोडणकर, प्रियांका मयेकर, योगेश सुर्वे,वाहिद अली हसनमिया बालाभाई, फरमान मेहराजबी दांडेकर, अभय गोयथळे, शंकर मुरमुरे या उमेदवारांचा विजय झाला असून महाविकास आघाडीमध्ये महमद रफिक वाजुद्दीन सारंग,चंद्रकांत पारदले, नंदिनी नवजेकर,रिहाना दर्वेश, प्रतीक्षा नरवणकर या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
रत्नागिरीमधील सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. स्थानिक आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. सर्व नऊच्या नऊ जागांवर निकम पॅनलचे उमेदवार विजयी झालेत. एकूण 17 ग्रामपंचायत उमेदवारांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उरलेल्या नऊही जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात.