Narendra Modi यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू - मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौ-याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.;

Update: 2023-02-10 16:17 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा मुंबईत आले होते. त्यांनी आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्याप्रमाणे विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस या दोन रेल्वे सेवांना सीएसएमटी स्थानकावरुन हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या आठवड्यात झालेल्या ग्लोबल सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक नंबरवर आहेत. ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.मुंबई (mumbai) ते सोलापूर (solapur) आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण आज करण्यात आले. हि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. महाराष्ट्राला १३,५०० कोटी रुपये कधीही मिळाले नव्हते, असे शिंदे यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम रेल्वेसाठी देण्यात आल्याचे 

Tags:    

Similar News