चंद्रपूरच्या दारुचा पैसा कोणाला हवा आहे? डॉ अभय बंग

Update: 2021-05-27 15:15 GMT

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवल्याची घोषणा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी निराशा व्यक्त केली आहे.

डॉ अभय बंग यांनी सरकारचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. १ लाख महिला आणि ५८५ ग्रामपंचायत प्रस्ताव लागू झालेली दारूबंदी सरकारने उठवली असून सरकार देत असलेले कारण अयोग्य आहे. या दारूबंदीची अंमलबजावणी करण्यात सरकार फेल झाले आहे.

सरकार कल्याणकारी योजनांसाठी दारूबंदीवर कर मिळतो. असे सांगते पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट चालवण्यासाठी मला दारूच्या पैशाची गरज नाही असे सांगितले आहे. मग हा दारूचा पैसा नक्की कोणाला हवा आहे? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Full View

Tags:    

Similar News