राज्यात पुन्हा निर्बंध जारी : महाराष्ट्रात प्रवेशासाठी कोरोना टेस्ट बंधनकारक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राने खबरदारी म्हणुन दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात यायचं असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा लागेल. अन्यथा तुम्हाला रिटर्न जावे लागणार आहे.;

Update: 2020-11-23 12:57 GMT

हिवाळा सुरु झाल्यानंतर दिवाळी सणासुदीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढ झाली होती. महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना सुरु केली आहेत. आज सरकारने तातडीने मिशन बिगीन अगेन अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे.

विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 25 नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. नव्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यातून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासाची कोव्हिड टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. तसेच दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक करण्यात आलं आहे.


Tags:    

Similar News