अदानी, अंबानींच्या कार्यालयांवर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेली सव्वीस दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना आता या आंदोलनाची धग महाराष्ट्रातही जाणवू लागली आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांचा मोर्चा अदानी आणि अंबानी यांच्या कार्यालयावर धडकणार आहे. यासाठी धुळ्यातून 2000 शेतकऱ्यांनी मुंबईत पोचले आहेत. लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला आहे.

Update: 2020-12-22 03:00 GMT

मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 16 डिसेंबर रोजी केला होता. तसेच, 22 डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता धुळ्यातून लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रणेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2000 शेतकरी मुंबईत पोचला आहे.

संपूर्ण महाराट्रातून हा मोर्चा निघत आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील शेतकरी धुळे येथील गुरुद्वारा येथे जमून ते नाशिक मार्गे मुंबईत पोचले आहेत. या मोर्चाला 27 शेतकरी आणि इतर संघटनांनी पाठींबा दिला आहे. यावेळी शेकऱ्यांकडून कृषी कायदेविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. तसेच केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी त्यांच्याकूडन केली जात आहे. तसेच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागाण्या मान्य केल्या नाहीत तर या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात येईल असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांना जाहीर विरोध केलेला आहे. हे कायदे तत्काळ मागे घ्यावेत असी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पुण्यात 16 डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यानी हे कृषी कायदे अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांच्या भल्यासाठी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्य कार्यालयावर काढण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. राजू शेट्टी मुंबईतील बीकेसी मैदानातून मोर्चाची सुरवात करणार आहेत.

Tags:    

Similar News