नाशिक : बाळाची हत्या करुन स्वत: आईने देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. संबधित महिलेसोबत बाळाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकलेलं नाही.
नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. पोलिसांना या महिलेची सुसाईड नोट मिळून आली आहे. सुसाईड नोटमध्ये या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असं या महिलेनं लिहिलं आहे.
तिकडे राजस्थानमध्ये देखील राज्यातील बाडमेरमधून असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. दोन चिमुकल्यांची हत्या करुन एका महिलेने गळफास घेतल्याची घटना समोर आली होती. सहा वर्षांची मुलगी व तीन वर्षांच्या मुलाचा जीव घेऊन विवाहितेने स्वतःचंही आयुष्य संपवल आहे. हुंड्यामुळे सासरच्या दबावाला कंटाळून या महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या भावाने केला आहे.